valpoi Tag

पणजी, वाळपईची पोटनिवडणूक २३ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं केली घोषणा पोटनिवडणुकीचा निकाल २८ ऑगस्टला लागणार विधानसभेच्या पणजी आणि वाळपई मतदारसंघाची पोटनिवडणूक चतुर्थीनंतर लगेचच म्हणजे २३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केलीये. या निवडणुकीचा निकला २८ रोजी जाहीर केला जाईल. या निवडणुकीचं वेळापत्रक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी जाहीर केलंय.Read More
वाळपई मार्केट संकुलाच्या वाहनतळाला तळ्याचे स्वरूप वाळपई पालिकेचे दुर्लक्ष; दुचाकी चालक झाले हैराण पालिकेने पंप लावून पाण्याचा उपसा केला सुरू वाळपई मार्केटखाली दुचाक्यांसाठी उभारलेल्या पार्किंग तळाला सध्या स्विमिंग पुलाचे स्वरूप आलं असून दुचाकी चालक हैराण झालेत. हा प्रकार लक्षात येताच पालिकेनं बुधवारी पंप लावून पाण्याचा उपसा सुरू केला. दोन वर्षांपूर्वीच हे नवं मार्केट संकुल बांधण्यात आलं होतं. पण पावसाळ्यात इथल्या पार्किंग तळा तळ्याचं स्वरूप येत असल्याचं लक्षात येऊनही पालिकेनं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप दुचाकी चालकांनी केलाय.Read More
वाळपईचे माहिती घर बनले पांढरा हत्ती! अनेक महिन्यांपासून माहिती घर बंद वाळपईचं माहिती घर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्यानं नागरिकांचे हाल होताहेत. सध्यासाध्या कामांसाठी नागरिकांना वेगवेगळ्या सरकारी कार्यालांचे उंबरठे झिजवावे लागताहेत. पूर्वी सरकारी कामे या माहिती घरातून सुटसुटीत व्हायची. त्यामुळं हे माहिती घर त्वरित सुरू करावं, अशी मागणी स्थानिकांनी केलीये.Read More
वाळपई कृषी खाते बनले पांढरा हत्ती संपूर्ण तालुक्याला केवळ दोनच ट्रॅक्टर खते, बियाणेही वेळेवर मिळेनात शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी सरकारनं राज्यात हरितक्रांतीची घोषणा दिली असली आणि शेतीसाठी विविध योजना चालू केल्या असल्यातरी तालुकास्तरीय कार्यालये निष्क्रिय ठरत असल्याची टीका वाळपईतील शेतकऱ्यांनी केलीये. कृषी खात्याच्या वाळपई कार्यालयात तर प्रचंड गैरसोयी आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांना वेळेवर खते आणि बियाणी मिळत नाहीत. सध्या या कार्यालयाकडे केवळ दोनच ट्रॅक्टर आहेत. संपूर्ण तालुक्यातील शेती नांगरण्यासाठी अवघे दोन ट्रॅक्टर देऊन शेतकऱ्यांची कुचंबना केली आहे. सरकारनं याकडे लक्ष द्यावं, अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केलीये.Read More
सोलयेतील आंगणवाडीकडे पंचायतीचे दुर्लक्ष आंगणवाडी मुलांसाठी बनलीये धोकादायक सत्तरी तालुक्यातील सोलीये गावातील अंगणवाडी धोकादायक बनलीये. अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलीयेत. आंगणवाडीसमोरील गटार तुंबून शाळेच्या समोरचं पाण्याचं डबकं बनलंय. यामुळं आंगणवाडीत येणाऱ्या १४ मुलांना धोका निर्माण झालाय. या आंगणवाडीची देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी गेल्या दहा वर्षांपासून केली जात असली तरी पंचायतमंडळ त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.Read More
वाळपई उपनगराध्यक्षपदी सर्फराज बिनविरोध रिक्त झालेल्या वाळपई पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सय्यद सर्फराज यांची बिनविरोध निवड झाली. एका अंतर्गत समझोत्यानुसार सेहेजीन शेख यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त होतं.Read More
नगरगाव पंचायतीत विजेचा लपंडाव मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे पूर्ण न केल्याचा परिणाम वीज खात्याचा अजब कारभार; नागरिक हैराण नगरगाव पंचायतीनं मान्सूनपूर्व कामात दिरंगाई केल्यानं त्याच फटका आता ग्रामस्थांना बसताहे. या भागात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून ग्रामस्थ हैराण झालेत. या प्रकारावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी इथल्या नागरिकांनी केलीये.Read More
अग्निशामक दलाचे अधिकारी माजिक सेवानिवृत्त दलाच्या वाळपई कर्मचाऱ्यांनी दिला निरोप वाळपई अग्निशामक दलाचे अधिकारी लक्ष्मण माजिक यांच्या सेवेचा कार्यकाळ बुधवारी पूर्ण होऊन ते निवृत्त झालेत. या निवृत्तीनिमित्त वाळपई अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून यांना निरोप दिला.Read More
पुन्हा मृत माकड सापडल्यानं वाळपईत भीती वनअधिकाऱ्यांनी येऊन केली जागेची पाहणी गेल्या दोन वर्षांपासून माकडतापानं दहशत माजवलेल्या वाळपई भागात शुक्रवारी पुन्हा एक मृत माकड सापडल्यानं स्थानिक भयभीत झाले. त्यांनी वेळ न दवडता वनखात्याला याची सूचना दिली. खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यांच्या मदतीनं येऊन या भागाची पाहणी केली आणि माकडाच्या मृतदेहाची तत्काळ विल्हेवाट लावली.Read More

Posted On June 5, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

Valpoi Fire dept gets monsoon-ready

पावसाळ्यातील आपत्काळासाठी अग्निशामक दल सज्ज वाळपई अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचा दावा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याठी वाळपईचे अग्निशामक दल सुसज्ज असल्याचा दावा दलाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी केलाय. पावसाळ्यात रस्त्यावर झाडे कोसळून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. किंवा अनेकदा झाडे घरावर कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. या सर्व परिस्थितीशी सामना करण्यासाठी दलाचे जवान सज्ज असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं.Read More
Close