vasco Tag

We are not moving, say Vascokars in risky BuildingsRead More
बायणा बीचवर जाण्यासाठी बांधल्या पायऱ्या गणेशभक्तांच्या वाटेतील चतुर्थीपूर्वीच विघ्ने झाली दूर आमदार मिलिंद नाईक यांचे स्थानिकांनी मानले आभार बायणाचं सौंदर्यीकरण करताना किनाऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात न आल्यानं आतापर्यंत पर्यटकांचे हाल होता होते. आता याच भागातून गणेश विसर्जन मिरवणूक जात असते. त्यांच्याही वाटेत विघ्नं येण्याची शक्यता लक्षात घेऊन इथल्या पायऱ्या तातडीनं बांधण्यात आल्या आहेत. याबद्दल गणेशभक्तांनी स्थानिक आमदार मिलिंद नाईक यांचे आभार मानलेत.Read More
माटोळीच्या साहित्याने वास्कोतील बाजार फुलला पावसानं दडी मारल्यानं माटोळीचं सामान महागलं गणेश भक्तांनी व्यक्त केली नाराजी वास्कोत यंदाचा माटोळीचा बाजार गुरुवारपासूनच गजबजला असून माटोळी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालीये. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं त्याचा परिणाम माटोळीच्या सामानावर झालाय. माटोळीची फळं महाग झाल्यानं ग्राहकांची पंचाईत झालीये. पण लाडक्या बाप्पाच्या आदरातिथ्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी महागाईवर मात करत सामान खरेदी करताना दिसताहेत.Read More
22 DENGUE CASES REPORTED IN MORMUGAO; MLA CARLOS TOOK REVIEW MEETING WITH HEALTH OFFICERSRead More
TRADITIONAL FISHERMEN IN VASCO RAISE CONCERN OVER MIGRANTS SELLING FISH ILLEGALLYRead More
एमपीटीची सीमा ठरवण्यास पॅरिशनर्सचा विरोध दस्तेरोवाडोवरील पॅरिशनर्सनी पाहणीलाही केला विरोध चर्चच्या जागेतून सीमारेषा ठरवण्यास केला विरोध मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीची सीमा निश्चित करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना दस्तेरोवाडोतील पॅरिशनर्सनी अडवून धरलं. इथले वेलंकिनी चर्च सरकारी जागेत आहे. पण ही जमीन सरकारकडून विकत घेतली असल्यानं या जागेवर प्रशासनाचा काहीही अधिकार नाही. केवळ एमपीटीसाठी सरकार आजूबाजूच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप या पॅरिशनर्सनी केलाय.Read More
VASCO LOCALS DEMANDS BEAUTIFICATION OF NEW VADDEM LAKE BEFORE CHATURTHIRead More

Posted On July 24, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

WALL OF OLD HOUSE COLLAPSED IN VASCO

वास्कोत कोसळले जुन्या घराची भिंत, छप्पर गोमती बांदोडकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान बांदोडकर यांना सहकार्य करण्याचे नगरसेवकाचे आश्वासन वास्को भागात पडत असलेल्या संततधार पावसामुळं रविवारी मायमोळे वास्को इथल्या गोमती बांदोडकर यांच्या जुन्या घराची भिंत आणि छप्पर कोसळल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं. घटनेच्या वेळी गोमती यांची सून घरात होती. तिने मोठा आवाज झाल्यानं बाहेर धाव घेतली. त्यामुळं जीवितहानी टळली. दरम्यान, स्थानिक नगरसेवकांनी घराची पाहणी करून बांदोडकर कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय.Read More
दाबोळी विमानतळावर ‘स्वच्छ भारत’ला हरताळ नव्या टर्मिनसच्या भिंती रंगल्या पान-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी जागोजागी कोसळलीयेत छताची सिलिंग प्रसाधनगृहातील सामग्रीचीही लागली वाट नव्या टर्मिनसची दोन वर्षांत गेली रया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘स्वच्छ भारत’च्या नाऱ्याला दाबोळी विमानतळ प्राधिकरणानं पूर्णपणे काळीमा फासल्याचं समोर आलंय. या विमानतळावर दोन वर्षांपूर्वीच नवीकोरी चकचकीत टर्मिनस इमारती उभारण्यात आली होती. अवघ्या दोन वर्षांत या इमारतीच्या भिंती पान, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्यानं इमारतीची रया गेलीये. आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या या विमानतळाच्या प्रसाधगृहातील सामग्री मोडकळीस आलीये. अनेक ठिकाणी छताचं सिलिंग तुटून पडलंय. नव्या टर्मिनसची इतकी दुर्दशा होईपर्यंत विमानतळ प्राधिकरण झोप काढतंRead More
Close