THIEVES TRY TO ROB SHOP IN MAPUSA; RETURN AS THERE WAS NO CASH

Posted On May 6, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


म्हापसा बाजारपेठेत फोडले दुकान
‘डांगी ऑप्टिकल’ दुकान दुसऱ्यांदा फोडले
छप्पर फोडून चोरटे शिरले दुकानात
कॅश नसल्याने चोर परतले हात चोळत

म्हापसा बाजारपेठेतील ‘डांगी ऑप्टिकल’ दुकान फोडून चोरट्यांनी रोकड पळवण्याचा प्रयत्न केला खरा, पण दुकानात रोकड नसल्यानं त्यांना हात चोळत पळ काढावा लागला. शनिवारी सकाळी मालकाने दुकानाचे शटर उघडताच हा प्रकार उघडकीस आला. दुकानावरील छत उखडून हे चोरटे आत घुसल्याचं दिसून आलं. त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. म्हापसा पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, वीस वर्षांपूर्वीदेखील अगदी अशाच पद्धतीनं हे दुकान फोडण्यात आलं होतं. त्या चोरट्यांचा शोध घेण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळं दुकानमालकानं नाराजी व्यक्त केलीये.

232
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close