सांगे मतदारसंघात लवकरच दोन पर्यटन प्रकल्प
बुडबुड्याची तळी, दत्तगुफा मंदिराचा होणार विकास
पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचे आश्वासन
सांगे मतदारसंघातील बुडबुड्याची तळी आणि दत्तगुफा मंदिर ही दोन ठिकाणे पर्यटनदृष्ट्या विकसित केली जाणाराहेत. त्यासाठी अनुक्रमे २ कोटी ५२ लाख आणि २ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात येणाराहेत, अशी माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सोमवारी सभागृहाला दिली. आमदार सुभाष फळदेसाई यांनी याविषयी प्रश्न प्रश्न विचारला होता.
दरम्यान, साळावली धरणाकडेलाही कॉटेजिस खाजगी उद्योगांना दिले जाणाराहेत. त्यासाठी तयारी केल्याची माहिती मंत्री परुळेकर यांनी दिली.