Unequipped 108, Severely Burnt Man Told To Get into Ambulance on His own, Later dies at hospital

Posted On June 30, 2017 By In Special Stories, Top Stories


वैद्यकीय मदतीसाठी अग्रेसर असलेल्या १०८ वाहिकेचा दर्जा अजून वाढवला जाईल अस नुकत आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितल होत . राज्याच्या कोणत्याही भागात अपघात किवा वैद्यकीय मदत हवी असल्यास अवघ्या काही मिनिटात घटनेस्थळी मदतकार्या साठी पोहचते ती १०८ रुग्ण वाहिका मात्र आगीत होरपळलेला रुगणाला किवा जळित रुग्णांना हाताळण्यासाठी रुग्ण वाहिकेकडे यंत्रणा नाहीत का असा प्रश्न गुरुवारी घडलेल्या प्रकारवून उपस्थित झालाय
सोशल मिडीयावर वायरल होत असलेल्या या व्हिडियो मुळे १०८ रुग्ण वाहिके बाबत बरेच प्रश्न उपस्थ्ती होत आहे ज्याच उत्तर 108 च्या अधिकार्यान कडून मिळणे अपेक्षित आहे
मोबाईलवर चित्रित केलेला हा प्रकार वेगळीच कहाणी सांगते सदर घटना हि कुंडई वसाहतीजवळ घडली असून त्वरित या घटनेची माहिती पोलीस तसच गोवेकरांच्या विश्वासात उतरलेल्या १०८ रुग्ण वाहिकेला उपस्थितांनी फोन द्वारे कळवलं अवघ्या काही मिनिटात दोन्ही यंत्रणा घटने स्थळी पोहचली मात्र रुग्णाला रुग्णवाहिकेत न्याव कस असा भला मोठा प्रश्न त्याच्या समोर उपस्तीत झाला वास्तविक अश्या गंभीर प्रसंगी तातडीन मदत कार्य सुरु होण गरजेच असत मात्र या व्हिदिओ मध्ये अस काही दिसत नाही हा प्रकार सुरु असताना आगीत होरपळेला हा युवक स्वताहून रुग्ण वाहिकेत बसला . कुंडई वसाहत ते गोमेंको पर्यत रुग्ण वाहिकेत त्याला कोणती वैद्यकीय मदत दिली त्याच्यावर कोणते प्राथमिक उपचार केले गेले हा पुन्हा अनुत्तरीत प्रश्न आहे कारण तशी सुविधा रुग्णवाहिकेत आहे कि नाही आणि अश्या परीस्थित रुग्णांना हाताळण्याच प्रशिक्षण कर्मचार्यांना आहे कि नाही याच उत्तर १०८ च्या अधिकार्यांनी देण अपेक्षीत आहेत. दरम्यान स्वताहून रुग्णवाहिकेत बसलेल्या या युवकाचा शुक्रवारी गोमेकोत मृत्यू झाला

275
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close