AFTER VASCO POLICE STATION LOCALS RAISE ISSUE OF PATHETIC CONDITION IN DABOLIM AIRPORT

Posted On July 13, 2017 By In Local, People, Top Stories


दाबोळी विमानतळावर ‘स्वच्छ भारत’ला हरताळ
नव्या टर्मिनसच्या भिंती रंगल्या पान-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी
जागोजागी कोसळलीयेत छताची सिलिंग
प्रसाधनगृहातील सामग्रीचीही लागली वाट
नव्या टर्मिनसची दोन वर्षांत गेली रया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘स्वच्छ भारत’च्या नाऱ्याला दाबोळी विमानतळ प्राधिकरणानं पूर्णपणे काळीमा फासल्याचं समोर आलंय. या विमानतळावर दोन वर्षांपूर्वीच नवीकोरी चकचकीत टर्मिनस इमारती उभारण्यात आली होती. अवघ्या दोन वर्षांत या इमारतीच्या भिंती पान, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्यानं इमारतीची रया गेलीये. आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या या विमानतळाच्या प्रसाधगृहातील सामग्री मोडकळीस आलीये. अनेक ठिकाणी छताचं सिलिंग तुटून पडलंय. नव्या टर्मिनसची इतकी दुर्दशा होईपर्यंत विमानतळ प्राधिकरण झोप काढतं आहे का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केलाय.

258
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close