VINAY TENDULKAR TO BE BJP’S RAJYA SABHA POLL CANDIDATE

Posted On July 5, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


राज्यसभेसाठी भाजपतर्फे विनय तेंडुलकरांना उमेदवारी
गोव्यात प्रथमच बिगर काँग्रेसी राज्यसभा खासदार बनण्याची शक्यता

गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर हे लवकरच गोव्याचे राज्यसभा खासदार बनणार आहेत. गोव्यासाठी राज्यसभा जागा मंजूर झाल्यानंतर प्रथमच बिगर काँग्रेसचे ते पहिले खासदार बनतील. या जागेसाठी तेंडुलकर यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज सादर केला.

राज्यात सध्या आघाडी सरकार सत्तेवर असून त्यात भाजप हा प्रमुख राजकीय पक्ष आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या गोवा फॉरवर्ड, मगो आणि तीन अपक्षांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. गोवा विधानसभेचे ४० सदस्य आहेत. त्यात काँग्रेसचे विश्वजित राणे आणि भारतीय जनता पार्टीचे सिद्धार्थ कुंकळकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सध्या विधानसभेची सदस्यसंख्या ३८ झालीये. हे ३८ सदस्य राज्यसभेसाठी मतदान करतील.

230
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close