VINTAGE CAR AND BIKE RALLY

Posted On October 1, 2016 By In Local, Off-Beat, People, Top Storiesव्हिन्टेज बाईक आणि कार महोत्सव उत्साहात
महोत्सवात दीडशेपेक्षा जास्त व्हिन्टेज गाड्यांचा सहभाग
पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांच्या हस्ते उद्घाटन

‘गोवा पर्यटन खात्या’तर्फे यंदा पहिल्यांदाच शनिवारी व्हिन्टेज बाईक आणि कार महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये झालेल्या महोत्सवात दीडशेपेक्षा जास्त व्हिन्टेज गाड्या सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवाचं उद्घाटनं पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं.

महामार्गावरून क्लासिक कारगाड्या दिसेनाशा झाल्या असल्या तरी गोवेकर ‘व्हिन्टेज काळ’ आणि त्या काळातील नागरिकांना सेवा देणाऱ्या ‘हेरिटेज मूल्य’ असलेल्या गाड्या विसरलेले नाहीत. अशा व्हिन्टेज बाईक्स आणि कारची जपणूक करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्याचा हेतूनं पर्यटन खात्यानं शनिवारी व्हिन्टेज कार्स आणि बाइक्स महोत्सव आयोजित केला होता. पाटो – पणजीतील पर्यटन भवनाजवळ या अनोख्या महोत्सवाला पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर झेंडा दाखवला. त्यानंतर व्हिन्टेज कार्स आणि बाइक्स राजधानीतून फिरत फिरत दोनापावला जंक्शनपर्यंत पोहोचल्या. नंतर आयनॉक्स कोर्टयार्ड इथं संध्याकाळपर्यंत या गाड्यांचं प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनात 1921 ते 1970 या कालावधीतील व्हिन्टेज दुचाकी आणि चारचाकी गाड्या सहभागी झाल्या होत्या. या गाडयांनी गोवेकरांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. यामध्ये सिट्रॉन, ऑस्टिन, मॉरिस, कॅडिलॅक, फोर्ड, शेव्हर्ले, मर्सिडीज, फोक्सवॅगन आणि नॉर्टन, बीएसए आणि बीएमडब्ल्यूसारख्या दुचाकींचा समावेश होता. यावेळी सर्वांत जुन्या आणि आकर्षक कारसाठी तसंच इतर विविध स्पर्धा आणि उपक्रमांसाठी बक्षिसेही देण्यात आली.

196
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close