[WATCH] RASH DRIVING BY KADAMBA DRIVER CAPTURED ON CAMERA

Posted On November 1, 2016 By In Local, People, Top Stories


कदंबचा प्रवास बनला असुरक्षित..
कदंबचालक उठलेत प्रवाशांच्या जीवावर…
पहा ‘इन गोवा’चा खास रिपोर्ट…
कदंब चालक बनलेत ‘यमदूत’…

कदंबचे चालक मद्य पिऊन बेदरकरापणे गाडी चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असल्याचा प्रकार नुकताच इन गोवाच्या नजरेस आलाय. एका सुजाण नागरिकानं हा प्रकार स्वत:च्या कॅमेरात कॅच करून तो व्हीडीओ इन गोवाला दिलाय. हा व्हीडीओ पहिल्यानंतर कदंबचा प्रवास किती सुरक्षित आहे, हे तुम्हाला समजेल.

कदंबचा प्रवास बनला असुरक्षित..
कदंबचालक उठलेत प्रवाशांच्या जीवावर…
पहा ‘इन गोवा’चा खास रिपोर्ट…
कदंब चालक बनलेत ‘यमदूत’…

असं म्हटलं जातं, ‘कदंबचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास’… पण कदंबचे चालक किती सुरक्षित गाडी चालवतात, हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. एका सुजाण नागरिकानं हा व्हिडीओ इन गोवाला उपलब्ध करून दिलाय. हे चित्रीकरण ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आलंय. GA-03-X-0397 या क्रमांकाची कदंब बस रस्त्यावरून कशी धावतेय ते पहा… तुम्ही जो बघत आहात तो, आंतरराज्य दुहेरी महामार्ग आहे.

या रस्त्यावर केवळ बाजूनं आणि जास्तीत जास्त ताशी ६० किलोमीटर वेगानं वाहनं चालवणे बंधनकारक असतं. मात्र हा कदंब चालक पुढील ट्रकला ओव्हरटेक करण्यासाठी स्वत:ची लेन सोडून भरधाव वेगानं गाडी चालवत आहे. दुसरी लेन ही विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनांसाठी आहे. आता अचानक समोरून एखाद वाहन आलं तर काय होईल, हे सुजाण नागरिकांना सांगण्याची गरज नाही. गेल्याच आठवड्यात धारगळ इथं कदंब बसच्या धडकेत एका दुचाकी चालकाचा जीव गेला. त्या घटनेतून या चालकानं अजिबात बोध घेतला नसल्याचं स्पष्ट होतंय. हा चालक भरधाव वेगानं गाडी चालवत आहे. गाडीचा वेगही ताशी ६५ किलोमीटरच्या वर असल्याचं दिसून येतं.

आणखी पुढे पहा… हा कदंब चालक बेशिस्तपणे लेनसोडून बिनधास्तपणे गाडी चालवत आहे. गाडीवर त्याचं नीट नियंत्रणही नसल्याचं या ठिकाणी स्पष्ट होतं. हा चालक अतिमद्यप्राशन करून गाडी चालवात असावा, असा संशय या ठिकाणी बळावतोय. तशाच स्थितीत या चालकानं ट्रकला कसं ओव्हरटेक केलं ते पहा… विरुद्ध दिशेने दुचाकी आणि चारचाकी वाहने येत असतानाही चालकानं ट्रकला ओव्हरटेक केलंय. ओव्हरटेक करताना एक कार तर कदंबला घासून गेल्याचं तुम्ही बघितलं असेल. या गाडीत मोठ्या संख्येनं प्रवासीही आहेत. त्यांचाही जीव या चालकानं कसा धोक्यात घातलाय, तेही तुम्ही बघितलं असेल. एकंदरीत हे कदंब चालक प्रवासी आणि वाहचालकांसाठी यमदूत बनलेत. अशा कदंब चालकांवर महामंडळ काय कारवाई करणार, असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जाताहेत.

509
SHARES

Tags : , ,

1 Responses

  1. SERIOUSLY ! You call this rash driving ??

    Come to Chennai and see your self what rash driving is

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close