WATCH WHY GSIDC OFFICER GETS ANGRY

Posted On June 14, 2016 By In Local, People, Top Stories


पायाभूत विकास महामंडळाचा पहा पारदर्शकपणा (?)
पत्रकारांना अंधारात ठेवून केली जाताहेत कामे
धावशिरे सरकारी विद्यालयाच्या दुरुस्तीकामावेळी झाले उघड
दुरुस्ती कामाचे चित्रीकरण रोखण्याचा झाला प्रयत्न
महामंडळाच्या महिला अधिकाऱ्याची पत्रकारांवर आरेरावी

गोवा पायाभूत विकास महामंडळानं पावसाला सुरू झाल्यानंतर उसगावातील धावशिरे सरकारी विद्यालयाचं दुरुस्तीकाम हाती घेतलं. या कामाची पाहणी करण्यासाठी महामंडळाची एक महिला अधिकारी मंगळवारी त्या ठिकाणी पोहोचली; मात्र काही कारण नसताना पत्रकारांना पाहून तिचा पारा अचानक चढला आणि मुख्याध्यापकांवर दात ओठ खावून तिथून निघून गेली.
शिक्षण क्षेत्रात गोव्यानं देशभरात नावलौकिक मिळवल्याच्या फुशारक्या नेहमीच सरकारकडून मारल्या जातात; पण इथल्या सरकारी शाळांची अवस्था काय आहे, याची झलक उसगावच्या धावशिरे सरकारी विद्यालयाकडे पाहिल्यावर येते. सरकारी शाळांच्या दुरुस्तीचे काम गोवा पायाभूत विकास महामंडळामार्फत केले जाते, पण पावसाळा आला तरी महामंडळानं या शाळेकडं पाहिलं नव्हतं. या शाळेची इमारत म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा बनलीये. त्यामुळं शाळा व्यवस्थापनानं जवळच अर्धवट बांधकाम केलेल्या एका खाजगी इमारतीत वर्ग चालू केलेत. या इमारतीच्या खोल्यांना अजून खिडक्या-दारेही नाहीत. त्यामुळं तसं तिथंही विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होताहे. हा सर्व प्रकार समजल्यावर महामंडळाच्या एका महिला अधिकाऱ्यानं मंगळवारी या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापकही त्या ठिकाणी उपस्थित होते. या विषयाची बातमी करण्यासाठी गेलेल्या इन गोवाच्या पत्रकाराला मात्र विचित्र प्रकाराला सामोरं जावं लागलं. पत्रकार केवळ इमारतीचे चित्रीकरण करत होते; मात्र या महिला अधिकाऱ्यांना अचानक राग आला. त्यांनी पत्रकारांना चित्रीकरण बंद करण्याची तंबी दिली.

त्यानंतर बाहेर येऊन या महिला अधिकाऱ्यानं शाळेच्या मुख्याध्यापकांना धारेवर धरलं. तुम्ही पत्रकारांना बोलावलंच कसं, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, उत्तर न देता गाडीत बसून त्यांनी बाहेरचा रस्ता धरला. आता पत्रकारांपासून लपवून ठेवण्यासाठी नक्की कोणती गोष्ट होती, हे मात्र समजू शकलं नाही. अशाप्रकारे पारदर्शकता नसलेलं महामंडळ कसा कारभार करते, याचाच हा नमुना म्हणावा लागेल.

204
SHARES

Tags : , ,

1 Responses

  1. This is how they treat people. They are acrually public servants…. But see their rudeness…. They are doing work late and on that scolding poor reporter.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close