[WATCH]HERA-PHERI OF GOA FERRY SERVICE

Posted On August 1, 2016 By In Local, People, Top Stories


बेती – पणजी फेरीसेवेचा उडाला बोजवारा
एक फेरीबोट मांडवीच्या पत्रातच भरकटली
फेरीबोट भरकटल्यानं प्रवाशांना फुटला घाम
मदतीला गेलेली फेरीबोटसुद्धा अडकली
कॅप्टन ऑफ फोर्टनं केली मदत

नदी परिवहन खात्याचा भोंगळ कारभार!
ऐन धावपळीच्या वेळी दोन्ही फेरीबोट बिघडल्या
बेती जलमार्गावरील प्रवासी बनले संतप्त
विद्यार्थी, कामगारवर्गाचे प्रचंड हाल
जलमार्ग बंद झाल्यानं मांडवी पुलावर वाहनांची रेलचेल

मांडवी नदीवर तिसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू असल्यानं हा मार्ग प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनलाय. त्यामुळं बहुतेकजण बेती-पणजी जलमार्गाचा आसरा घेताहेत; मात्र सोमवारी सकाळी या मार्गावरील दोन्ही फेरीबोट बिघडल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या प्रकारावरून प्रवाशांनी नदी परिवहन खाते आणि सरकारवर जोरदार टीका केली.

मांडवी नदीवर तिसऱ्या पुलाचं बांधकाम चालू असल्यानं या मार्गावरून प्रवास करणं अत्यंत धोकादायक बनलंय. बाजूच्या रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडल्यानं पावसाचं पाणी साचून जागोजागी डबकी तयार झालीये. त्यामुळं या मार्गावर वाहन चालवनं महाकठीण कर्म होऊन बसलंय. विशेषत: दुचाकी चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावं लागतं. त्यामुळं बहुतेक दुचाकीचालक पणजी-बेती जलमार्गाचा अवलंब करू लागलेत; मात्र या जलमार्गावरही सरकारनं अनेक अडचणी निर्माण करून ठेवल्याहेत. या मार्गावर अनेकदा एकच फेरीबोट असते. तीही बिघडलेली असते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे दोन फेरीबोटी चालू होत्या. एक फेरीबोट प्रवाशांना घेऊन धक्क्यावरून निघाली खरी, पण दुसऱ्या काठाला पोहोचण्याआधीच तिच्या क्लचप्लेटस तुटल्या. त्यामुळं बोटचालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले. ही बोट मांडवीच्या पात्रात सरकत चक्क मांडवीच्या पुलाखाली पोहोचली. या प्रकारानं प्रवाशांनाही घाम फुटला. या बोटीच्या मदतीला दुसरी फेरीबोट पाठवण्यात आली; मात्र दोन्ही फेरीबोटी अडकून पडल्या. अखेर मरीन पोलिसांना हा प्रकार समजताचं त्यांनी धाव घेतली, पण दोन मोठ्या फेरीबोट हटवण्यासाठी त्यांच्याकडे मोठी यंत्रणा नव्हती. लगेच कॅप्टन ऑफ पोर्टशी संपर्क साधण्यात आला. कॅप्टन ऑफ पोर्टनं एक मोठी बोट पाठवून दोन्ही बोटींना धक्के मारत सांतामोनिका जेटीवर आणलं. तिथं अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं.

दोन्ही फेरीबोट दुपारपर्यंत बंद ठेवल्या. आठवड्याचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थी, कामगारवर्गाची लगबग चालू होती. फेरी धक्क्यावर पोहोचल्यानंतर फेरीबोट नसल्याचं पाहून त्यांचा पारा चढला. फेरीबोट नेमकी का बंद आहे? कधी चालू होणार? याची उत्तर देण्यासाठी कोणीही जबाबदार व्यक्ती नव्हती. दरम्यान, प्रवाशांनी इन गोवाशी संपर्क साधला. त्यानंतर इन गोवानं चौकशी केल्यावर दोन्ही फेरीबोटच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं सांगण्यात आलं; मात्र फेरीसेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल, हे सांगितलं नाही.

दरम्यान, सरकारनं या प्रकाराकडे लक्ष देऊन मांडवीचा तिसरा पूल होईपर्यंत बेती-पणजी फेरीबोट सेवा सुरळीत ठेवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होताहे.

377
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close