WATER SCARCITY IN PONDA, WATCH WHAT LOCALS HAS TO SAY

Posted On June 9, 2016 By In Agriculture, Local, People, Top Stories


पाण्यासाठी जीव आला रडकुंडीला
बेतोडा-निरंकालच्या नागरिकांची व्यथा
भाजपच्या विकासाचा खरा चेहरा आला समोर

विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भाजप शासनाचा खरा चेहरा पहायचा असेल तर निरंकाल-बेतोडा भागात फेरफटका मारल्यावर दिसेल. एका बाजूला विविध योजना आखून सरकारी तिजोरीतील पैसा खिरापतीप्रमाणे वाटून स्वत:ची पाठ थोपटणाऱ्या भाजपच्या राज्यात वीज आणि पाणी या मुलभूत सुविधांसाठी जनतेला जीवाचं रान करावं लागताहे.

पाणी म्हणजे जीवन…
पाण्यासाठी फिरावे लागताहे वणवण
भाजपच्या राज्यात कठीण झाले जीवन..
सुखी जीवनाचा झाला चुराडा…
समोर आला भाजपचा खरा चेहरा…

भाजपच्या विकासाचा खरा चेहरा बघायचा असेल तर जरा फोंडा तालुक्यातील बेतोडा, निरंकाल भागातील जनतेला विचार… भाजपनं केलेल्या विकासाच्या फळाची चव कशी आहे, ते इथले नागरिक तुम्हाला बरोबर सांगितलं… या ठिकाणी पाण्यासारखी जीवनावश्यक बाबही सरकार नीट पुरवू शकत नसल्याचं समोर आलंय… काय म्हणताहेत इथले नागरिक ते नीट एका…

दरम्यान, जनतेच्या समस्यांवर पांघरून घालण्याचं काम इथले भाजप नेते करताहेत. या भागात पाण्याची काहीच समस्या नसल्याचा दावा इथले भाजपनेते करताहेत.

अशाप्रकारे जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी समस्या लपवून स्वत:ची पाठ थोपटणाऱ्या भाजपला येत्या निवडणुकीत जनता काय उत्तर देते, हे पाहावं लागेल.

235
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close