NOW GET FINED IF YOU DON’T STOP YOUR VEHICLE AT ZEBRA CROSSING!

Posted On March 27, 2017 By In Local, People, Top Stories


‘झेब्रा क्रॉसिंग’वर न थांबल्यास वाहन चालकांना दंड
वाहतूक खात्याची २९ मार्चपासून मोहीम
झेब्रा क्रॉसिंगवर पदचाऱ्यांचाच अधिकार

झेब्रा क्रॉसिंगवर रस्ता ओलांडण्याचा पहिला अधिकार पादचाऱ्यांना असतो, मात्र वाहनचालक या नियमांचा भंग करताहेत. अशा वाहनचालकांच्या विरोधात येत्या २९ मार्चपासून कडक मोहीम सुरू करण्याचा निर्धार वाहतूक खात्यानं केलाय.
गोव्यात वाहनांची संख्या वाढल्यानं इथले रस्ते सदानकदा वाहनांनी गजबजलेले असतात. त्यामुळं पादचाऱ्यांना रस्ता ओलांडून जाणे कठीण बनतं. यासाठी वाहतूक खात्यानं रस्त्यांवर अनेक ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग आखले आहेत. नियमानुसार झेब्रा क्रॉसिंगवरून कोणी रस्ता ओलांडत असेल, तर चालकाला वाहन थांबवणे बंधनकारक असतं, परंतु बहुतेक ठिकाणी वाहन चालक हा नियम मोडत असल्यानं रस्ता ओलांडणाऱ्यांची पंचाईत होताहे. याविषयी वाहतूक खात्यानं दंड थोपटले असून २९ मार्चपासून अशा नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय खात्यानं घेतलाय. यासंदर्भात सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पणजी इथं बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.

239
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close