CMP PROMISES COCONUT ‘STATE TREE’ STATUS

Posted On June 19, 2017 By In Politics, Top Stories


युती सरकारचे ‘किमान समान धोरण’ जाहीर
गोवा फॉरवर्डचे भाजप सरकारवरील वर्चस्व झाले स्पष्ट
भाजपच्या अनेक धोरणांना गोवा फॉरवर्डमुळे मुरड

राज्यात सत्तेवर आलेल्या युती सरकारचं ‘किमान समान धोरण’ अखेर सोमवारी जाहीर झालं असून यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचा सरकारवर चांगलाच दबदबा असल्याचं स्पष्ट दिसून आलं. भाजप, मगो आणि गोवा फॉरवर्ड पक्षानं एकमेकांच्या विरोधात जाहीरनामा बनवून विधानसभा निवडणूक लढली होती. यामध्ये विशेषत: गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची स्थापना, माडचा तृणवर्गात समावेश करणं, कूळ कायद्यात दुरुस्ती या विषयावरून गोवा फॉरवर्ड पक्षानं भाजपला विरोध केला होता. आता सरकारला पाठिंबा दिल्यानं भाजपला स्वत:च्या निर्णयाला मुरड घालावी लागली, तर भाषा प्रश्नावरून मगोला मुरड घालावी लागलीये. या ‘किमान समान धोरणा’ची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

 

274
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close