INAUGURATION Tag

Posted On August 2, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

INAUGURATION OF NEW VADDEM OUT POST

नवेवाडेत पोलीस आऊट पोस्ट कार्यान्वित पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी केले उद्घाटन पोलीस निरीक्षक रापोस यांची उपस्थिती नवे वाडे वास्को इथं नवीन पोलीस आऊट पोस्ट कार्यान्वित करण्यात आलंय. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बुधवारी या आऊट पोस्टचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि वास्कोचे पोलीस निरीक्षक आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.Read More

Posted On July 11, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

VINOD PALYEKAR INAUGURATES POND AT CANCA

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ पुन्हा अस्तित्वात आणणार जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांची घोषणा काणका बांध येथील पारंपरिक ब्राह्मण देवाच्या तळ्याचे उद्घाटन काणका बांध येथील श्री सिद्धपुरुष नारायण देवाच्या पारंपरिक ब्राह्मण देवाच्या तळ्याचं रितसर उद्घाटन जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी स्थानिक पंचायतीचे सरपंच मिल्टन मार्किस, पंच दिगंबर कळंगुटकर आणि इतर सदस्य उपस्थित होते. “राज्यात पाण्याचा मुबलक साठा मिळावा, यासाठी पूर्वीची पारंपरिक ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ पद्धत जलस्रोत खात्याच्या माध्यमातून पुन्हा सुरू केली जाईल, अशी घोषणा मंत्री पालयेकर यांनी यावेळी केली.Read More
‘गणपत पार्सेकर कॉलेज’च्या नूतन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्थिती मांद्रेतील ‘गणपत पार्सेकर कॉलेज’च्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आलं. हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचं यंदा सुर्वणमहोत्सवी वर्ष साजर करण्यात येताहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून हा नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.Read More
द. गो. भाजपसाठी मडगावात सुसज्ज कार्यालय स्थापन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन मडगाव कदंब स्थानकासमोरील रिलायन्स मॅग्नम इमारतीत सहाव्या मजल्यावर भारतीय जनता पक्षाचं सुसज्ज कार्यालय स्थापन करण्यात आलंय. या कार्यालयाचं उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडूलकर आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
गणपत पार्सेकर कॉलेजच्या नव्या वास्तूचे ४ रोजी उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती मांद्रे इथं ‘गणपत पार्सेकर कॉलेज’साठी नवी वास्तू बांधण्यात आलीये. या वास्तूचं उद्घाटन ४ जुलै रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More
INAUGURATION OF YOGA CLASSES IN GS AMONKAR VIDYA MANDIRRead More
ईडीसी पार्कच उदघाटन ईडीसी तर्फे पणजीत उभारण्यात आलेल्या ईडीसी पार्क च उद्धाटन मुख्य मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते करण्यात आल . यावेळी मुख्यमंत्र्यांनी ईडीसी सारखी सरकारी महामंडळे फायद्यात येत असल्या बद्दल समाधान व्यक्त केले.Read More
गिरीत ३.३६ कोटी खर्चून विकासकामे पुर्णत्वास पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्या हस्ते उद्घाटन गिरीतील मोन्तेगिरी रस्त्याचं रुंदीकरण, पदपथ आणि सौंदर्यीकरण करण्यात येताहे. त्याचबरोबर पोखुरली तळ्यातील गणेश विसर्जन स्थळाचे सौंदर्यीकरण करण्यात येणाराहे. या दोन्ही कामांचे उद्घाटन पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. सुमारे ३ कोटी ३६ लाख रुपये खर्चून पर्यटन खात्यामार्फत ही कामे सुरू असल्याची माहिती मंत्री परुळेकर यांनी यावेळी दिली.Read More
Close