RAJYA SABHA Tag

राज्यसभेसाठी तेंडुलकर यांचा उमेदवारी अर्ज सादर कॉंग्रेसतर्फे पुन्हा शांताराम नाईक यांनाच उमेदवारी तेंडुलकर विरुद्ध शांताराम यांच्यात रंगणार सामना यावेळेस गोव्यात राज्यसभा निवडणुकीत इतिहास घडेल भाजप उमेदवार विनय तेंडुलकर यांची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी राज्यसभेसाठी मंगळवारी उमेदवार अर्ज सादर केला. तर कॉंग्रेसतर्फे पुन्हा एकदा शांताराम नाईक यांनाचं उमेदवारी देण्यात आली असून त्यांनीदेखील मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यामुळं गोव्यात राज्यसभेसाठी तेंडुलकर विरुद्ध नाईक यांच्यात चुरशीची लढत होणाराहे. राज्यसभेचे खासदार म्हणून २००५ पासून काँग्रेसचे शांताराम नाईक यांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर तेंडुलकर यांनीRead More
राज्यसभेसाठी भाजपतर्फे विनय तेंडुलकरांना उमेदवारी गोव्यात प्रथमच बिगर काँग्रेसी राज्यसभा खासदार बनण्याची शक्यता गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर हे लवकरच गोव्याचे राज्यसभा खासदार बनणार आहेत. गोव्यासाठी राज्यसभा जागा मंजूर झाल्यानंतर प्रथमच बिगर काँग्रेसचे ते पहिले खासदार बनतील. या जागेसाठी तेंडुलकर यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज सादर केला. राज्यात सध्या आघाडी सरकार सत्तेवर असून त्यात भाजप हा प्रमुख राजकीय पक्ष आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या गोवा फॉरवर्ड, मगो आणि तीन अपक्षांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. गोवा विधानसभेचे ४० सदस्य आहेत. त्यात काँग्रेसचे विश्वजित राणे आणिRead More
बांधकाममंत्र्यांचा शांताराम नाईक यांच्यावर घणाघात नाईक यांना राज्यसभेवर पाठवणे ही गंभीर चूक राज्यसभा खासदार असूनही गोव्यासाठी काहीही केले नाही मंत्री सुदिन ढवळीकर यांची घणाघाती टीका बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांच्यावर जाहीर कार्यक्रमात शाब्दिक टोले हाणले. २०१२ पूर्वी राज्यावर कॉंग्रेसचं शासन होतं. केंद्रातही कॉंग्रेस शासन होतं. त्यामुळं राज्यसभेवर शांताराम नाईक यांना पाठवण्यात आलं. पण नाईक यांनी गोव्यासाठी कोणतंही भरीव काम केलं नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेवर पाठवल्याची आम्हाला खंत वाटते, अशी झणझणीत टीका मंत्री ढवळीकर यांनी यावेळी केली.Read More
Close