दोन खनिज ब्लॉक्स कार्यान्वित करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व खाण मंत्रालयाचे मानले आभार गोव्यातील खाण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला *४०० कोटी रुपयांचा निधी* मंजूर केला आहे. हा निधी *‘Special Assistance to States for Capital Investment * या उपक्रमांतर्गत देण्यात आला असून, चालू आर्थिक वर्षात दोन खनिज ब्लॉक्स कार्यान्वित करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ही मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, या निधीपैकी *३०० कोटी रुपये खनिज ब्लॉक्स कार्यान्वित करण्यासाठी* तर *१०० कोटी रुपये राज्याने SMRI श्रेणीत सर्वोत्तम कामगिरी* केल्याबद्दल देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी आणि खाण मंत्रालयाचे आभार मानत सांगितले की, *“गोवा सरकारने पारदर्शक लिलाव प्रक्रियेद्वारे खाण ब्लॉक्सचे वाटप केले असून ही मदत राज्याच्या खाण क्षेत्र, रोजगार आणि एकूण अर्थव्यवस्थेला नवा वेग देईल.”* आत्तापर्यंत गोव्यात एकूण *१२ खनिज ब्लॉक्स लिलावाद्वारे वितरित* करण्यात आले असून, त्यापैकी *तीन ब्लॉक्सचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे.*
Categories
Political
गोव्यातील खाण क्षेत्राला चालना — केंद्र सरकारकडून राज्याला ४०० कोटींचा निधी मंजूर
