Categories Political

एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानदारांत केरोसीन वितरण सुरू करा – काँग्रेसची मागणी

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा परिणाम; गोवा काँग्रेस एससी विभाग अध्यक्ष विठू मोराजकर यांची सरकारकडे मागणी इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे देशभरात एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य काँग्रेस एससी विभागाचे अध्यक्ष विठू महादेव मोराजकर यांनी नागरी पुरवठा खात्याने रेशन दुकानदारांतून केरोसीनचे वितरण पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे एलपीजी आयातीवर परिणाम झाला असून भारतातही पुरवठा साखळी विस्कळीत होत असल्याचे दिसत आहे . त्यामुळे सामान्य नागरिकांना पर्यायी इंधन उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे मोराजकर यांनी नमूद केले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *