हरवलेल्या मौल्यवान वस्तू दोन प्रवाशांना सुरक्षितपणे परत ANCHOR – मडगाव रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांच्या सेवेसाठी राबवलेल्या ‘ऑपरेशन अमानत’ मोहिमेअंतर्गत दोन प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू पुन्हा मिळवून दिल्या आहेत. १६ डिसेंबर रोजी तेजस एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाची बॅग विसरली गेली होती, ज्यामध्ये ५० हजार रुपयांचा मोबाईल आणि ३,४२० रुपयांची रोकड असा एकूण ५३,४२० रुपयांचा मुद्देमाल होता. ‘रेल्वे मदत’वरून तक्रार प्राप्त होताच आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत ही बॅग सुरक्षित ताब्यात घेतली. त्याच दिवशी मडगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर सापडलेली आणखी एक बॅगही पोलिसांनी शोधून काढली. १७ डिसेंबर रोजी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे सर्व साहित्य त्यांच्या खऱ्या मालकांना सुपूर्द करण्यात आले असून, प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या तत्परतेचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत.
Categories
Civic Issues
‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत मडगाव आरपीएफची कौतुकास्पद कामगिरी

