मसाज घोटाळा; पर्यटकाची ₹२९ हजारांची फसवणूक कळंगुट परिसरात मसाज सेवेच्या आमिषाने एका पर्यटकाची ₹२९ हजारांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर काही काळ आटोक्यात आलेल्या अशा बेकायदेशीर प्रकारांनी पुन्हा डोके वर काढल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या गटांकडून मोठ्या संख्येने परत येऊन स्थानिकांना धमकावले जात असल्याचीही तक्रार असून, पर्यटन केंद्राची सुरक्षितता धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकार आणि पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Categories
Civic Issues
कळंगुटमध्ये बेकायदेशीर कृत्यांना पुन्हा उधाण
