कोणतीही अधिसूचना नसल्याचा आरोप; आमचे प्रतिनिधी पोहोचताच काम बंद महामार्ग अडवून कोणतीही पूर्वसूचना न देता स्पीड ब्रेकर बसविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित स्पीड ब्रेकर बसविण्यासाठी कोणतीही शासकीय परवानगी किंवा अधिसूचना जारी करण्यात आलेली नव्हती. आमचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचताच स्पीड ब्रेकर बसविण्याचे काम तात्काळ थांबविण्यात आले. या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, प्रशासनाकडून स्पष्ट खुलासा आणि कारवाईची मागणी होत आहे.
Categories
Civic Issues
काणकोण महामार्गावर बेकायदेशीर स्पीड ब्रेकर ? काम थांबवले

