जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी; नागरिक त्रस्त कुडचडे येथील गिरीश भोजनालयासमोर असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेल्या एक महिन्यापासून फुटलेली असून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. हे पाणी थेट नाल्यात वाहत असल्याने परिसरात सतत ओलावा निर्माण झाला आहे. त्याच ठिकाणी नाल्यात कचरा टाकला जात असल्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही अद्याप पाईपलाईन दुरुस्ती न झाल्याने PWD च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांनी तात्काळ दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी केली आहे.
Categories
Civic Issues
कुडचडे येथे महिनाभर पाण्याची नासाडी