₹३५ हजार कोटींचा खाण घोटाळा व JAICA घोटाळ्याचा दाखला; २०२७ निवडणुकीसाठी प्रत्येक बूथवर ५०% मते मिळवण्याचे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी गोव्यातील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. ₹३५ हजार कोटींचा खाण घोटाळा तसेच JAICA घोटाळा हे कॉंग्रेस सरकारच्या काळातील असल्याचा आरोप करत त्यांनी “कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचार” असे ठामपणे सांगितले. आगामी २०२७ विधानसभा निवडणुका गोव्याला विकसित राज्य बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे नमूद करत, प्रत्येक बूथवर NDA आणि भाजपसाठी किमान ५० टक्के मते मिळवण्याच्या उद्दिष्टाने काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
Categories
Political
“कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचार” : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन