आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते वाहनाचा शुभारंभ; ग्रामस्वच्छतेला नवी गती कोरगाव ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलत स्वच्छ भारत योजनेअंतर्गत कचरा उचल करणारे वाहन प्रदान करण्यात आले. आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते या वाहनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच देविदास नागवेकर, हरमल जिल्हा पंचायत सदस्य राधिका पालयेकर, पंच सदस्य तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून ग्रामस्वच्छतेला नवी चालना मिळणार आहे.
Categories
Civic Issues
