पीक नष्ट होण्याच्या वाढत्या घटनांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले; कुंपण, संरक्षणात्मक उपाययोजना व तातडीच्या भरपाईची मागणी गोव्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या वारंवार हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पीकहानी होत असल्याचा गंभीर मुद्दा Sadanand Shet Tanavade यांनी Rajya Sabha मध्ये उपस्थित केला. झिरो अवरदरम्यान बोलताना तानावडे यांनी सांगितले की, गोव्यातील अनेक कुटुंबांचा प्रमुख उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. मात्र जंगलालगतच्या भागात रानडुक्कर, माकडे, गवा, खार यांसारखे वन्यप्राणी वारंवार शेतात घुसून पिकांचे मोठे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. अनेकदा कापणीच्या काही दिवस आधीच पिके नष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना योग्य व वेळेत भरपाई मिळत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर तानावडे यांनी शेती क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी मजबूत कुंपण, सोलर किंवा इलेक्ट्रिक फेन्सिंगसारख्या उपाययोजना करण्यासाठी CAMPA निधीचा वापर करण्याची तसेच सुलभ आणि वेळेत भरपाई देण्याची व्यवस्था करण्याची मागणी सरकारकडे केली.
Categories
Political