Categories Political

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ४४ व्या दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री डॉ.सावंत यांना मानद डी.लिट पदवी

लोकमान्य टिळकांच्या विचारांवर उभ्या संस्थेकडून सन्मान; हा गौरव गोव्यातील जनतेला आणि गुरूजनांना अर्पण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ४४ व्या दीक्षांत समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मानद डी.लिट (Doctor of Literature) पदवी प्रदान करण्यात आली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांवर उभ्या असलेल्या या प्रतिष्ठित संस्थेकडून मिळालेला हा सन्मान अत्यंत अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. हा गौरव गोव्यातील जनतेला तसेच आपल्या गुरूजन आणि शिक्षकांना समर्पित करत सार्वजनिक सेवेसाठी मिळणाऱ्या प्रेरणेचा उल्लेख त्यांनी केला. यावेळी समारंभात पदवीधर विद्यार्थ्यांनाही त्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *