व्हाळशी, साष्टीवाडा, शांतारामनगर व राधानगर भागात वारंवार दर्शन डीचोली तालुक्यातील व्हाळशी, साष्टीवाडा, शांतारामनगर आणि राधानगर या भागांत बिबट्याची हालचाल वाढल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवडाभरात विविध ठिकाणी व वेगवेगळ्या वेळेला बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले असून काहींच्या मते तो भटक्या कुत्र्यांवर हल्ले करत आहे.मंगळवारी दुपारी सुमारे १२.३० वाजता राधानगर येथील भीमराव कांबळी यांनी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून बाहेर पाहिले असता बिबट्या दिसल्याचा दावा केला. दरम्यान, एका डिलिव्हरी बॉयची दुचाकी तेथून गेल्यानंतर बिबट्या पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळीही बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.वनविभागाने प्राण्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला असला तरी परिसरात रात्रीची गस्त आणि देखरेख वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सायंकाळी लहान मुले खेळण्यासाठी बाहेर पडतात तसेच जवळच वृद्धाश्रम असल्याने ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारतात, यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माध्यमांद्वारे नागरिकांनी वनविभागाला तातडीने लक्ष देऊन कडक पाळत ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Categories
Civic Issues
डीचोली परिसरात बिबट्याची हालचाल वाढली; नागरिकांकडून कडक गस्तची मागणी

