बीएलओमार्फत घराघरात फॉर्म वाटप; सर्व पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट दक्षिण गोव्यातील जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार गणनाक्रम फॉर्मचे वितरण सुरू करण्यात आले आहे. बीएलओ (Booth Level Officers) यांच्या माध्यमातून घराघरात जाऊन हे फॉर्म दिले जात आहेत. या उपक्रमाचा उद्देश सर्व पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट होऊन लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे हा आहे, असे जिल्हाधिकारी क्लीटस यांनी सांगितले.
Categories
Political
दक्षिण गोव्यात मतदार गणनाक्रम फॉर्मचे वितरण सुरू

