अपक्ष उमेदवार उदय मांद्रेकरांचा अनिकेत साळगावकरांना जाहीर पाठिंबा ANCHOR – धारगळ जिल्हा पंचायत मतदारसंघात गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार अनिकेत साळगावकर यांची ताकद वाढली आहे. अपक्ष उमेदवार उदय मांद्रेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेत साळगावकर यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. एका पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कळंगुटकर आणि राम नागवेकर उपस्थित होते. या घडामोडीमुळे आता धारगळ मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे पारडे जड झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Categories
Political
धारगळ जिल्हा पंचायत मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे पारडे जड

