६५० रुपयांत कामाचे आश्वासन, पण ५,५०० रुपये उकळले; यूपीमधील दोघांना मडगाव पोलिसांकडून अटक तळगावचे रहिवासी देवू नाईक हे फेसबुकवरील जाहिरतीवरून संपर्क केलेल्या एसी रिपेयर एजन्सीच्या स्कॅमचे बळी ठरले. सुरुवातीला फक्त ६५० रुपये खर्च येईल असे सांगून दोन जणांनी त्यांच्या घरी भेट दिली. मात्र दुरुस्ती दरम्यान त्यांनी एसी संपूर्णपणे उघडून आतल्या सिलेंडरमधील गॅस विनाकारण रिकामा केला आणि नाईक यांच्याकडून तब्बल ५,५०० रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतर व्हॉट्सअॅपवर बिल पाठवू असे सांगूनही ते न पाठवता आरोपी गायब झाले. दरम्यान, मडगाव पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील don sanshyitana अटक केली असून नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Categories
Crime
फेसबुक जाहिरतीवरून एसी रिपेयर स्कॅम; ताळगावचे देवू नाईक फसवणुकीचे बळी

