Categories Political

फोंडा पोटनिवडणूक निर्णय ‘धक्कादायक’– मुख्यमंत्री

“निर्णय आधी आला असता तर परिस्थिती वेगळी असती”; विजयाचा विश्वास कायम फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र प्रतिक्रिया देत तो “धक्कादायक” असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी केंद्रातील नेतृत्वाशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हा निर्णय आधी आला असता तर परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आली असती, असेही त्यांनी नमूद केले. भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत, प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, फोंड्याचे मतदार भाजपसोबत असल्याचा दावा करत विरोधकांवर भाष्य करण्यास त्यांनी टाळले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *