अंत्रूज पत्रकार संघाच्या पुढाकारातून टेनिस बॉल स्पर्धा; कर्मचाऱ्यांसाठी विरंगुळा आणि संवादाचा मंच आंत्रूज पत्रकार संघ, पोंडा यांच्या वतीने पोंडा व धारबांदोडा तालुका स्तरावरील शासकीय विभागांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रवी नाईक क्रीडा संकुल, कुर्टी-पोंडा येथे 21 मार्च रोजी स्पर्धेला सुरुवात होणार असून 22 मार्च रोजी अंतिम सामना रंगणार आहे. पाच षटकांच्या या विशेष मनोरंजनात्मक स्पर्धेचा उद्देश दैनंदिन कामाच्या तणावातून शासकीय कर्मचाऱ्यांना थोडासा विरंगुळा मिळावा तसेच एकमेकांमध्ये संवाद आणि मैत्री वृद्धिंगत व्हावी हा आहे. या स्पर्धेसाठी गोवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे.
Categories
Sports

