दोन मजल्यांचा विस्तार, परवडणाऱ्या उपचारांसह एआय-आधारित स्क्रिनिंग; ‘अंत्योदय’ दृष्टीकोनातून जनतेसाठी आरोग्यसेवा बांबोळी येथील टर्शियरी कॅन्सर केअर सेंटरच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाची पाहणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केली. यावेळी त्यांनी रुग्णांसाठी विशेष सेवांवर लक्ष केंद्रित करणारे आणखी दोन मजले उभारण्याची घोषणा केली. पीपीआयएलटीच्या सहकार्याने जीवनरक्षक उपचार परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे, भव्य वैद्यकीय शिबिरांद्वारे तपासणीपासून उपचारापर्यंतची सोय लोकांच्या दारी पोहोचवणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कॅन्सरचे लवकर निदान या सुविधा केंद्रामध्ये सुरू होणार आहेत. “सबको स्वास्थ्य, सबको सम्मान” या घोषणेसह अंत्योदयाच्या दृष्टीकोनातून प्रत्येकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचा संकल्प यानिमित्ताने अधिक दृढ होत आहे.
Categories
Political