पाचव्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने विद्यापीठ हादरले बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये पुन्हा विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ माजली ,२० वर्षीय विद्यार्थी रिषी नायर याने आत्महत्या केल्याने गेल्या एका वर्षातील कॅम्पसमधील हि विद्यार्थांच्या आत्महत्येची पाचवी घटना ठरली यापूर्वीच्या घटनांमध्ये ओम प्रियान सिंह, अथर्व देसाई ,कृष्णा कसेरा आणि कुशाग्र जैन यांचा समावेश आहे. या सलग घडलेल्या घटनांनी विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, शैक्षणिक दबाव आणि कॅम्पसमधील समुपदेशन सुविधांबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. विद्यार्थी तसच माजी विद्यार्थांनी प्रशासनाला या प्रणालीगत समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने आणि पारदर्शक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Categories
Civic Issues