उद्घाटनाला अवघे ३०-४० दिवस; बाजारात अस्वच्छता, डासांची पैदास, डेंग्यू-मलेरियाचा धोका मडगाव येथील नव्याने पुनर्विकसित घाऊक मासळी मार्केटचे उद्घाटन होऊन अवघे ३० ते ४० दिवस झाले असतानाच बाजार परिसरात अस्वच्छता आणि अस्वास्थ्यकारक परिस्थितीचे चित्र दिसून येत आहे. गटारांमध्ये साचलेले पाणी डासांची पैदास केंद्र बनले असून डेंग्यू व मलेरियाचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व मडगाव नगरपालिकेने तातडीने संयुक्त पाहणी करून या आरोग्यविषयक धोक्याचे निराकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Categories
Civic Issues

