जखमी रुग्णाला खाजगी वाहनातून हॉस्पिटलला हलवण्याची वेळ; सरकारच्या कारभारावर संताप मांद्रे येथे आपत्कालीन सेवा देणारी १०८ रुग्णवाहिका अचानक बंद पडल्याने आरोग्य व्यवस्थेचा फज्जा उडाला. एका जखमी रुग्णासाठी तातडीने १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती, मात्र वाहनच निकामी असल्याचे उघड झाल्याने वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. अखेर नातेवाईकांना रुग्णाला खाजगी वाहनातून हॉस्पिटलला हलवावे लागले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, सरकारने मांद्रे तालुक्यासाठी तातडीने सक्षम व नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
Categories
Civic Issues
मांद्रेत १०८ रुग्णवाहिका बंद; आपत्कालीन आरोग्य सेवा कोलमडली

