रॉबर्ट फर्नांडिस यांचा राजीनामा; निवडणुकीत एकमेव अर्ज आल्याने सावंत यांची निवड Mandrem ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किरण सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अलिखित करारानुसार विद्यमान सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर १३ रोजी सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत किरण सावंत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य Tara Hatfadkar यांनीही उपस्थित राहून किरण सावंत यांचे अभिनंदन केले. स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनीही नव्या सरपंचांना शुभेच्छा देत गावाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
Categories
Political
मांद्रे पंचायत सरपंचपदी किरण सावंत बिनविरोध

