महिलांचा रुद्रावतार; सरकारविरोधात तीव्र नाराजी, पंचायत निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता मिराबाग बंधाऱ्याविरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज नववा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. स्थानिक महिलांनी रुद्रावतार धारण करत सरकारच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलकांचे म्हणणे आहे की, सरकारने त्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून त्यामुळे जनतेचा संताप वाढत आहे. या आंदोलनाचा परिणाम आगामी पंचायत निवडणुकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, स्थानिक राजकारण्यांच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Categories
Civic Issues
मिराबाग बंधाऱ्याविरोधातील धरणे आंदोलनाचा नववा दिवस
