Categories Art & Culture

मिशन फॉर लोकल’तर्फे मोटरसायकल पायलट सगुण गवंडी यांना अपघाती विमा लाभ

बजाज अलायन्सच्या माध्यमातून दोन लाख रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स आणि दरमहा वीस हजार रुपयांची आर्थिक मदत ‘मिशन फॉर लोकल’ या संस्थेतर्फे पेडण्यातील सर्व मोटरसायकल पायलट आणि टॅक्सी चालक-मालकांसाठी अपघाती विमा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सगुण गवंडी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या एप्रिल महिन्यात ते एका भीषण अपघातात गंभीर जखमी झाले होते आणि तब्बल एक महिना ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होते. सध्या पूर्णपणे बरे न झाल्याने ते आपला व्यवसाय पुन्हा सुरू करू शकलेले नाहीत. मात्र, ‘मिशन फॉर लोकल’ आणि बजाज अलायन्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून त्यांना अपघाती विमा पॉलिसीचा लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स तसेच महिन्याला वीस हजार रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे पेडण्यातील चालक वर्गात समाधानाची भावना निर्माण झाली असून, अशा योजनांमुळे अपघातग्रस्तांना आर्थिक आणि मानसिक आधार मिळतो आहे.

About The Author

More From Author

3 comments

… [Trackback]

[…] Find More on that Topic: ingoanews.com/मिशन-फॉर-लोकलतर्फे-मोटर/ […]

… [Trackback]

[…] Read More to that Topic: ingoanews.com/मिशन-फॉर-लोकलतर्फे-मोटर/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *