सांडपाण्यामुळे तेमवाडा ते दाभोलकरवाडा परिसरातील तळ्यांची अवस्था बिकट पेडणे तालुक्यातील मोरजी येथील तेमवाडा भागातील तळे प्रदूषित झाल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिक, पर्यटक, मैदान कर्मचारी तसेच जवळच असलेल्या पीटर आल्वारेस शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते तेमवाडा ते दाभोलकरवाडा परिसरातील अनेक तळे सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने संपूर्ण गावातील तळ्यांची तपासणी करून जर हॉटेलांकडून सांडपाण्याच्या पाइपलाईनद्वारे तळ्यात पाणी सोडले जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोरजीम वरिष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवनाथ शेटगावकर, स्थानिक वासुदेव काण्णाईक तसेच अल्बर्ट फर्नांडिस यांनी केली.
Categories
Civic Issues
मोरजी तेमवाडा येथील तळे प्रदूषित; दुर्गंधीमुळे नागरिक व पर्यटक त्रस्त