‘मडगाव’ फेरी रॅम्प अचानक तांत्रिक बिघाडामुळे कोसळा; कॅप्टनवर निष्काळजीपणाचा आरोप रायबंदर चोडण जलमार्गावर चालणाऱ्या ‘मडगाव’ फेरीच्या हायड्रोलिक सिस्टममध्ये मंगळवारी संध्याकाळी अचानक बिघाड झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तांत्रिक बिघाडामुळे फेरीचा रॅम्प अचानक खाली पडला परिणामी त्यावर उभे असलेल्या अनेक प्रवाशांचा तोल जाऊन ते जखमी झाले . घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी फेरी कॅप्टनवर निष्काळजीपणाचा आरोप करत फेरीच्या कॅबिनमध्ये धाव घेतली. पुढील चौकशी सुरू आहे.
Categories
Civic Issues

