पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचा दावा; काल ३०० सिलिंडर वितरण, ७०० सिलिंडर साठा आणि दोन ट्रक मार्गावर Vasco येथे गॅस सिलिंडरच्या संभाव्य तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर घाबरून सिलिंडर खरेदी केल्याचे चित्र दिसून आले. मात्र या पार्श्वभूमीवर Krishna Salkar यांनी नागरिकांना घाबरून खरेदी करू नये, असे आवाहन करत गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.दरम्यान, स्थानिक गॅस एजन्सीचे प्रभारी गोपाल जी यांनी दिलेल्या माहितीनुसार काल सुमारे ३०० सिलिंडरचे वितरण करण्यात आले असून सध्या ७०० सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. तसेच आणखी दोन ट्रक सिलिंडर घेऊन मार्गावर असल्याने पुरवठा सुरळीत राहील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Categories
Civic Issues
वास्कोत गॅस सिलिंडरची घाबरून खरेदी– आमदार कृष्णा साळकर