Categories Civic Issues

सत्तरीत स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांची जयंती उत्साहात साजरी

सत्तरीतील जमिनीच्या प्रश्नावर जनजागृती करण्याचा निर्धार सत्तरी तालुक्यात स्वाभिमानी नागरिकांच्या वतीने गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी स्वाभिमानी नागरिकांच्या समितीने सत्तरी तालुक्यातील जमिनीच्या प्रश्नावर जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थानिकांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करून या विषयावर लोकांना एकत्र आणण्याचे काम समितीमार्फत पुढे राबवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *