गोव्यातील सर्वांत उंच पुतळा ठरणार; तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात शिवसंस्कार दालनाच्या उद्घाटनाने सांगे येथे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण उद्या करण्यात येणार असून, गोव्यातील सर्वांत मोठी मूर्ती म्हणून इतिहास रचला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज छत्रपतींच्या पराक्रमाचा आणि गौरवशाली इतिहासाचा परिचय करून देणारे ‘शिवसंस्कार दालन’ साईशा फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते.
Categories
Civic Issues
सांगेत भव्य छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे उद्या अनावरण
