कामगिरीच ठरवेल नेतृत्व : राणे पोंडा येथे प्रचारादरम्यान मंत्री विश्वजीत राणे यांनी भाजप उमेदवार ऋतेश नाईक यांना पाठिंबा दर्शवत त्यांना “सायलेंट वर्कर” असे संबोधले. नाईक जास्त बोलत नाहीत, मात्र कामातून आपली क्षमता दाखवतात, असे राणे म्हणाले. त्यांनी मतदारांना आवाहन केले की, उर्वरित काळात नाईक यांना काम करण्याची संधी द्यावी. सातत्यपूर्ण कामगिरी हाच नेतृत्वाचा खरा मापदंड असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Categories
Political

