धोकादायक वळणावर सलग अपघात;— आठ दिवसांत उपाय न केल्यास पंचायतीसमोर ठाण मांडण्याचा इशारा सावर्डे धडे येथील धोकादायक वळणावर पुन्हा एक अपघात घडला आहे. ट्रक वळणावर पोहोचताच समोरून माल वाहतूक करणारे वाहन ओव्हरटेक करताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला बाहेर जाण्याचा प्रयत्न करावा लागला, त्याचवेळी पाठिमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराचे दोन्ही हात मोडले असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तत्काळ बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. गेल्या वर्षी याच वळणावर झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला होता. संकेत भंडारी यांनी पंचायतीच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत, आठ दिवसांत वळण कापून सुरक्षित न केल्यास पंचायतीसमोर ठाण मांडण्याचा इशारा दिला आहे.
Categories
Civic Issues
सावर्डे धडे वळणावर पुन्हा अपघात — दुचाकीस्वार गंभीर जखमी


… [Trackback]
[…] Find More on that Topic: ingoanews.com/सावर्डे-धडे-वळणावर-पुन्ह/ […]