मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव; स्वयं सहायता गट, ग्रामीण कारागीर व महिला उद्योजकांच्या कार्याचे कौतुक स्वयंपूर्ण गोवा सारस 2026 या ११ दिवस चाललेल्या भव्य प्रदर्शनाचा समारोप सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहून विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली तसेच विविध स्वयं सहायता गट, ग्रामीण कारागीर, महिला उद्योजक आणि स्थानिक उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. या प्रदर्शनात जीआय टॅग असलेली गोमंतकीय उत्पादने, हस्तकला, हातमाग, सेंद्रिय उत्पादने तसेच पारंपरिक खाद्यपदार्थांचे आकर्षक प्रदर्शन करण्यात आले होते.यावेळी ‘RE 4 Gender Idea Competition’ मधील विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला. महिला नेतृत्वाखालील नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पनांचे मुख्यमंत्री यांनी विशेष कौतुक केले. ग्रामीण विकास विभाग, जीएसआरएलएम, सहभागी स्वयं सहायता गट आणि सर्व संबंधित घटकांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
Categories
Political
स्वयंपूर्ण गोवा सारस 2026 चा समारोप उत्साहात