मंत्री विश्वजीत राणेंनी ७ व्या अधिवेशनात दिलेले आश्वासन हवेत विरले पोम्बुर्पा, एकोशी आणि ओलाऊली या गावांमधील ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आला आहे. मंत्री विश्वजीत राणेंनी ७ व्या विधानसभा अधिवेशनात या गावांना ‘नो डेव्हलपमेंट झोन’ घोषित करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही अधिकृत अधिसूचना न निघाल्याने आणि गावांमध्ये विकासाच्या नावाखाली हस्तक्षेप सुरू असल्याने स्थानिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.ग्रामस्थांनी अन्यायकारकपणे दिल्या जाणाऱ्या नोटीसांचा तीव्र निषेध केला असून, गावातील रस्ते रुंदीकरणामुळे घरांचे नुकसान होणाऱ्या कुटुंबांना योग्य तोडगा द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. सरकारकडून योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
Categories
Environment

промокоды пятерочка доставка промокод пятерочка доставка на первый заказ
… [Trackback]
[…] Read More Information here on that Topic: ingoanews.com/नो-डेव्हलपमेंट-झोनच्या/ […]