भाजप सरकारच्या विकासकामांचा आढावा; मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन तोरसे जिल्हा पंचायत मतदारसंघातील भाजप उमेदवार राघोबा कांबळी यांच्या प्रचारासाठी वजरी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला आमदार प्रवीण आर्लेकर यांचीही उपस्थिती होती. सभेत मुख्यमंत्री सावंत यांनी भाजप सरकारने राबवलेल्या विविध विकासकामांचा उल्लेख करत राघोबा कांबळी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप उमेदवारालाच संधी देण्याची विनंती मतदारांना केली.
Categories
Political
तोरसे जिल्हा पंचायतसाठी राघोबा कांबळींच्या प्रचारार्थ वजरी येथे मुख्यमंत्री सावंतांची जाहीर सभा

