सकाळपासून सुरू आंदोलन; संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची वाट पाहत निदर्शक युनिटी मॉल प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी विधानसभेवर धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पणजी बसस्थानकाजवळ पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत आंदोलनकर्त्यांना अडविले. सकाळपासून सुरू झालेले हे आंदोलन संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी आंदोलनकर्ते मुख्यमंत्री यांनी युनिटी मॉल प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करावी, याची प्रतीक्षा करत होते. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी ठाम भूमिका यावेळी घेतली
Categories
Civic Issues
युनिटी मॉल रद्द करण्यासाठी आंदोलनकर्ते आक्रमक